श्रीक्षेत्र पंढरपूर वारी

पंढरपूरची वारी महाराष्टाचे एक आगळे वेगळे नवल विशेष आहे. विश्वाला आनंद,आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिकीला शुध्द एकादशीला संपन्न होते. आषाढी वारीला सर्व संताच्या पालख्या पंढरीला लाखो वारकरी भक्त भाविकासह आपआपल्या गावापासून पायी वाटचाल करीत टाळवीणामृंदगाचे नादब्रह्माच्या आनंदात पंढरीत येतात.

वैशिष्टेः-

श्री बाबा महाराजांनी परंपरेची ही आळंदी ते पंढरपूर वारी चैतन्यधाम श्री क्षेत्र दुधिवरे ते आळंदी पालखी ही भर घालून अधिक आनंददायी वारी केली. जेष्ठ शुध्द पंचमीला चैतन्यधाम पासुन पालखी शुध्द सप्तमीला आळंदीत येवून अष्टमीला माऊलीबरोबर प्रस्थान करीत पंढरीची वाटचाल करते.

  • माऊलीच्या पालखीबरोबर असणा-या दिंडीत सर्वात मोठा फड. सर्व प्रांतीय, सर्व जातीय,समानतेच्या शुध्द भावनेने ऊक्ती आणि कृतीचे ऐक्य असलेले वारकरी समाविष्ट. सुशिक्षित आणि युवा वारकरी संख्येचे आधिक्य.

  • संप्रदायाचे भजनानंदासह आरोग्य सांभाळीत,खेळ खेळीत प्रवचन कीर्तनाच्या आणि महाराजांच्या समवेत सर्वसोयीयुक्त सुखमय पंढरीची आनंदवारी.

  • दिनक्रमानुसार काकडा, भुपाळी, नित्यपाठाचे, पंचपदीचे भजन, विविध रागदारीतील नामधुन, हरिपाठ, आरती इत्यादी सर्व ऊपक्रम

  • दरवर्षी पालखी सोहळ्याबरोवर १००० वारकरी भक्तांची विनामुल्य सोय.

  • फलटण मुक्कामी प्रतिवर्षी वारकरी माऊली भक्तांच्या डोळ्यांची तज्ञ डाँक्टरांकरवी मोफत तपासणी, चष्मेवाटप.

  • सासवड, वाल्हे, भंडी शेगाव, वाखरी मुक्कामी प्रवचन, लोणंद, पंढरी मुक्कामी कीर्तन लक्षावधी वारकरी आणि इतर नागरिकांची श्रवणार्थ विक्रमी गर्दी.