सातारकरांची वारकरी परंपरा

वारकरी संप़दाय परंपरातील प्रमुख सातारकर फड.

वारकरी संप़दाय परंपरामध्ये श्री सदगुरु दादामहाराज सातारकर आंध, तामिळनाडू, गुजरात व परदेशा मध्ये गेली सव्वाशे वर्षे या परंपरेमधून वारकरी संप़दायाच्या प्रचाराचे अत्यंत भरीव व प्रभावी कार्य चालू आहे. या परिसरातील हजारो सुशिक्षित मंडळीना वारकरी संप़दायाची व ज्ञानेश्वरीची गोडी सातारकर परंपरेमुळेच लागली. या फडाशी निगडित लाखोचेवर मंडळी.

सन १८७५ साली सातारा येथे श्री. सदगुरु दादामहाराज सातारकर यांचा जन्म झाला. घरामध्ये प्रथमपासुनच जरंडेश्वर श्री मारुतीची उपासना व वारी होती. वयाच्या अठरा-एकोणीसव्या वर्षीच महाराजांनी पंढरीची वारी करण्यास व हरिविजय, श्रीभक्तिविजय या गंथावर प्रवचने करण्यास सुरूवात केली. पंढरीच्या वारीनंतर महाराज कार्तिक वारीकरिता श्री क्षेत्र आळंदी येथे आले. तेंव्हा त्यांचा मुक्काम श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरात होता. महाराजांनी खोलीत एकटे असताना ‘ महाराज ज्ञानेश्वर माऊली ’ असे भजन करण्यास सुरुवात केली. भजनप्रेमात महाराज देहभान विसरले. अशा अवस्थेत असताना त्याना एका साधू पुरुषाने , आई जशी आपल्या बाळाला प्रेमाने ओवाळते तसे ओवाळून गळ्यात माळ घातली व सांगितले, ‘‘ तूं ज्ञानेश्वरी वाच, तुझ्या सर्व शंका फिटतील व तुझे कल्याण होईल." ते साधू पुरुष म्हणजे प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊलीच होत. बॅ. बाळारामजी धुरंधर यांनी महाजांचे आरतीत याचे फार गोड वर्णन केले आहे

ज्ञानदेवे स्वप्नीं आज्ञा तुज केली।
ज्ञानदेवी माझी वाच तू वदविली ।।

दादा महाराज

मंदिर इनडोअर

मंदिर बाहेर

अशा रीतिने महाराजानां प्रथम श्रीज्ञानेश्वर माऊलीचा अनुग्रह झाला.तसाच काही वर्षानंतर त्यांना श्री तुकाराम महाराजांचाही अनुग्रह झाला. महाराजांच्या देव्हा-यातील पादुका श्री जगदगुरु तुकाराम महाराजांच्याच आहेत. सन १९२५ साली पालखी काढणयाचे वेळेस महाराजांनी सातारा येथे ‘तुकाराम - तुकाराम ’ नामजपाचा सप्ताह केला. सप्ताहाच्या तिस-या दिवशी श्री जगदगुरु तुकाराम महाराजांनी दादा महाराजांना दृष्टांत दिला. त्यांना समोर एक सुंदर पवित्र भव्य शिवालय दिसले. तिथून एक व्यक्ति हातात पादुका घेवुन पुढ़े आली व तिने त्या पादुका महाराजांच्या मस्तकी ठेवल्या. असाच एक दृष्टांत सौ. बाप्पाई साताराकारानाही झाला.

अशी ही दिव्य व भव्य परंपरा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराज तुकाराम महाराज यांच्या कृपाप्रसादाने सुऱु झाली.

श्री सदगुरु दादामहाराजांनी मार्गशीर्ष शुध्द एकादशी, गुऱुवार दिनांक ५/१२/१९४६ (गीतांजयंती) रोजी सायंकाळी हरिकीर्तनात देह ठेवला. त्यानंतर महाराजांचे व्दितीय चिरंजीव श्री संत अप्पा महाराजांनी अत्यंत निष्ठेने ही परंपरा चालविली. त्यांचे श्री एकनाथ महाराजांच्यावर फारच प्रेम. त्यांनी पंचवीस वर्ष श्री एकनाथी भागवताची पारायणे केली. व सात वर्ष अमृतानुभव सांगितला. सतरा वर्ष रोज नित्यनेमाने श्रीज्ञानेश्वरीवर प्रवचने केली. सन १९६२ सालीं श्री नृसिंह जयंती, वैशाख शुध्द १४ रोजी श्री संत अप्पा महाराजांनी देह ठेवला.

त्यांच्यानंतर परम पूज्य बाबामहाराज सातारकर गादीवर आले व त्यांचे मार्गदर्शनाखाली ही परंपरा आज आनंदात चढत्यावाढत्या क्रमाने सुऱु आहे. लक्षावधी लोक नित्य नवा भक्तिप्रेबोधाचा आनंद लुटत आहे.