समाजकार्य - ज्ञानदान परंपरा सातत्य

कीर्तनप़वचनद्वारा करीत असलेल्या ज्ञानदानाच्या सातत्यासाठी पुढेही हेच कार्य परंपरेने चालू राहावे म्हणून महाराजांनी स्वतः अपार मेहनत घेवून घरात दोन ऊत्तम आपले प़तिरुप असे कीर्तनकार घडविले.एक म्हणजे स्त्री कीर्तनकार भगवतीताई सातारकर आणि दुसरे म्हणजे युवा कीर्तनकार चिन्मय महाराज सातारकर. महाराज बिंब तर चिन्मय महाराज प़तिबिंब. फडाचे ऊत्तराधिकारी म्हणून महाराजांनीं चिन्मय महाराजांवर आताच जबाबदारी टाकून घोषित केले आहे. या शिवाय महाराष्ट्र आणि त्या बाहेरही अनेक जण महाराजांना गुरुस्थानीं मानून कीर्तनप़वचनद्वारा प़चारआणि प़सार करीतच आहेत.