हरिनामसप्ताह आयोजन

महाराष्टाच्या सर्वच प्रमुख देव आणि संताच्या तीर्थक्षेत्रीं म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र काशी, येथे देवाचे गावीं तर नेवासा, त्रिबंकेश्वर, आळंदी, सासवड, एदलाबाद, देहु, भंडारा, पैठण, तेरढोकी,मंगळवेढा इत्यादी ठिकाणाचे सप्ताहाचे वेळी तेथील लोकांना परत वारी भरल्याचा अनुभव आला.

एवढे सप्ताहाचे वैशिष्टपूर्ण आयोजनही झाले होतेच, पण महाराजांच्या लोकप्रियतेचा,लोकांचा त्यांच्यावर असलेल्या श्रध्देचा तो एक मापदंडच होता. बारा वर्षे बारा तीर्थक्षेत्रीं एक तपाच्या सेवेनंतर मुळ गावीं सातारा येथेही हरिनामसप्ताह आयोजन करुन तपपूर्तिचा आनंदोत्सव केला.

हरिभजने धवळले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।
सेवितो हा रस वाटितो अनेका । घ्या रे होवू नका रानभरी ।।